ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचे व्याख्यान आयोजित.
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेर घर (महिला आश्रम) लताई अनाथालंय भोकर ता चिखली जिल्हा बुलढाणा र. नं. Mh534 F11058/09 यांच्या वतीने विश्वरत्न विश्व शांती दूत तथागत भगवान बुद्ध जयंती व अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त लोकप्रतिनिधी, राजकीय नेते सामाजिक नेते जेष्ठ पत्रकार समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा, बहुजन रत्न पुरस्कार सोहळा व फुले शाहू आंबेडकरी विचारावर व्याख्यान या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यातील वधू पित्यास महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या कन्यादान योजने अंतर्गत 20,000/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 8855850378 या नंबरवर संपर्क करावे. तसेच फुले शाहू आंबेडकरी विचार धारेला तेवत ठेवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करून जनसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका व्यक्ती ला फुले शाहू आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ह. भ. प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचा फुले शाहू आंबेडकरी विचारावर व्याख्यानचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच कार्यक्रम समाप्ती नंतर भोजनदान चे सुद्धा आयोजन आहे. तरी वरील कार्यक्रम चा आस्वाद घेण्यासाठी दि. 9 जून 2024 ला रोज रवीवार ला पंचशील बुद्ध , गजानन नगर चिखली ता. चिखली जिल्हा बुलडाणा येथे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेल आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.