मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी उपविभागातील पोलीस स्टेशन राजाराम खां. च्या वतीने हद्दीतील निराधाराना आधार म्हणजे पोलीस स्टेशन राजारामचे पोलीस अधिकारी. गेल्या 10 वर्षांपासून राजाराम खां. पोलीस स्टेशनच्या वतीने दादालोरा खिडकीच्या माध्यमातून निराधार व शेतकरी बांधवाच्या कल्याणासाठी विविध शेती उपयोगी साहित्य मोफत वितरण करण्यात येत आहे.
आठ ते नऊ वर्षा पूर्वी प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे व विजय कोल्हे यांच्या कार्यकाळापासून राजाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील नगरीकाना शेती साहित्य व जीवनापयोगी साहित्य मोफत वितरण सुरू करून पोलीस हे जनतेचे रक्षक असल्याचे दाखवून दिले.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून तिमरम येथील मीना रमेश इष्टाम हिने शिलाई मशीन चे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे ही बाब सद्याचे प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड यांना अवगत होताच सदर महिलेला मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिले आहे. सदर शिलाई मशीन वितरण करताना पोलीस स्टेशन राजारामचे पोलीस निरीक्षक साहेबराव कसबेवाड, उप पोलीस निरीक्षक जि. एन साखरे,पोउनि.ए. आर. जाधव,एच. एम. जुनघरे सहाय्यक फौजदार, तसेच जिल्हा पोलीस संतोष करमे व जिल्हा पोलिस हवालदार आणि सि आर पी एफ चे कर्मचारी उपस्थित होते.