अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- योगाच्या प्रती जन जागृती करण्या साठी 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केल्या जात आहे. योगा चे महत्त्व ओळखून पतंजली परीवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच द्वारा 10 वे आंतराराष्ट्रीय योग दिना निमित्य शारीरिक आणि मानसिक आजार शरीरा पासून दूर ठेवण्यासाठी आणि योगा चा प्रत्येकाच्या जीवना वर सकारात्मक प्रभाव होण्यासाठी शनिवार दिनांक 15 जुन 2024 ते 21 जुन 2024 पर्यंत रोज सकाळी 5.30 ते 7.30 वाजता भारत सरकार आयुष मंत्रालय व्दारा निर्देशित सामान्य अभ्यासक्रम नुसार भव्य योग व प्राणायम शिबीर तथा मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन जे. आर. निखोडे लॉन व सभागृह येथे केल्या जात आहे.
यात रोज सकाळी 6.00 ते 7.30 या वेळी पतंजली चिकित्सालय सराफा लाईन हिंगणघाट ची वैद्य दिपीका जैसवाल द्वारा सांधे दुखी, कंबर आणि माने चे आजार, जुने त्वचारोग, जुनी सर्दी, अर्ध डोके दुखी, कर्ण बधीरता, मूलांचे व महिला चे विविध आजार, हायड्रोसिल, मूळव्याध, भगंदर, संधिवात, थायराईट, मधुमेह, कँसर, इत्यादी रोगा वर वैद्य दिपीका जैसवाल या रोगनिदान करतील। सोबतच योग शिक्षक विजय धात्रक, राहुल वंजारे, पोर्णिमा धात्रक, विद्या पेंडके, प्राची पाचखेडे, रणजित जिवणे हे देखील योग, प्राणायम, कवायत व ध्यान इत्यादी त प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्य होणाऱ्या नि:शुल्क योग शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर मध्येें सर्वांनी सहकुटुंब सह परीवार सहभागी होण्याचे आवाहन पतंजली परीवार हिंगणघाट तर्फे पतंजली युवा भारत, महिला पतंजली योग समिती, पतंजली किसान सेवा समिती, अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा केल्या गेले आहे.

