श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्याना इनप्लांट ट्रेनिंगचे प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर लगेचच नोकरीची संधी मिळाली. बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना घडवणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. येथील अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या इनप्लांट ट्रेनिंगमध्ये १३ विद्यार्थ्याची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.
त्यामध्ये देशमुख गणेश (आय.टी.सी.फुड्स लि.), रजनीश वंजारी (हल्दीराम इंटरनॅशनल प्रा.लि.), मोरे केतन (आय.टी.सी.फुड्स लि.), शिवम देवकर (वेकफिल्ड फुड्स प्रा.लि.), वाघमोडे तात्या (बिसलेरी इंटरनॅशनल प्रा.लि.), प्रतिक थोरात (वेकफिल्ड फुड्स प्रा.लि.), मांटे धनंजय (प्रेरणा बेवरेज प्रा.लि.), दाते प्रांजल (वेकफिल्ड फुड्स प्रा.लि.), लिंबाळकर राम (आय.टी.सी.फुड्स लि.), पुलाटे मयंक (फ्रीगोरिफिको अल्लाना प्रा.लि.), माळी सिद्धमलप्पा (ईशा फुडस प्रा.लि.), जाधव अरुण (आय.टी.सी.फुड्स लि.), ईलग अनिकेत (प्रेरणा बेवरेज प्रा.लि.) यांची या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
बीडच्या आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे तेथील विद्यार्थी पुढे जावून चांगल्या पदावर दिसतात. या यशाबद्दल विद्यार्थ्याची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी परिषद सदस्या तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय डॉ. आदितीजी सारडा मॅडम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी शुभेच्छा दिल्या. यासाठी उप. प्रा. सोळंके ए. यु , ट्रेनिंग व प्लेसमेंट इन्चार्ज प्रा.गुजर जी.एम , प्रा. राठोड पी.एस, प्रा. पुंडे एम. ए. यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.