पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
दोन अवैध सावकारावर खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडुन कारवाई यातील फिर्यादी यांनी आरोपी नामे १) नवनाथ ज्ञानोबा मासाळ रा. माऊली निवास पिसोळी, ता. हवेली जि.पुणे याचेकडे त्याचे गरजे पोटी १० लाख रुपये उसने मागितले असता नवनाथ मासाळ याने त्याचा मित्र उमेश श्रीहरी मांगडे रा. मांगडेवाडी पुणे हा तुला १० लाख रुपये ५ टक्के प्रतिमहीना व्याज दराने देईल असे सांगुन सावकार उमेश गांगडे याचे सृष्टी हॉटेल, कात्रज गांगडेवाडी रोड पुणे येथे घेवुन जावुन नवनाथ मासाळ याने उमेश मांगडे याचेकडुन १० लाख रुपये ५ टक्के प्रतिमहीना व्याज दराने घेवुन व्याजाचा हप्ता कपात करुन ९,५०,०००/- रुपये फिर्यादीस देवुन उमेश गांगडे याने तारण म्हणुन फिर्यादीची गसडिज बेन्झ गाडी ठेवून घेतली. तसेच फिर्यादीने ४,१०,०००/- रुपये व्याजाचे परत केले काही महीने व्याज परत न केल्याने व्याजावर व्याजाची आकारणी करुन ते न दिल्याने आरोपी नवनाथ मासाळ व उमेश मांगडे याने संगणमत करून फिर्यादी यांच्याकडुन १ शॉप व १ फ्लॅट तारण ठेवुन घेवुन सदरचा फ्लॅट च शॉप सोडविण्यासाठी ३३ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन ते देत नसल्यामुळे फिर्यादीच्या घरात घुसुन जीवे ठार मारण्याची धमकी देत असले बाबत तक्रारी अर्ज पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे याचेकडे प्राप्त झाला. सदरचा अर्ज वरीष्ठांकडे सादर करुन वरीष्ठांनी सदर अर्जाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते..
सदर अर्जावरून फिर्यादी याने आरोपी नामे नवनाथ ज्ञानोबा मासाळ रा. पिसोळी बु. पुणे च उमेश श्रीहरी मांगडे रा. मांगडेवाडी पुणे याचे विरुध्द फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं.५९९ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८६.३८७,४५२ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९.४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळ गुन्हे शाखा, पुणे, मा. पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे गुन्हे शाखा पुणे शहर मा सहा. पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगने, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिश शितोळे, राहुल उत्तरकर, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सचिन अहीवळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, पवन भोसले, किशोर बर्गे, रवि संकपाळ, म.पो.शि. आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.
