उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्ह्यातील बोरगावं (मंजू) पोलीस ठाण्याच्या हद्दीत् येत असलेलेल्या डाळंबी जवळ एका ढाब्या वर सुरु असलेल्या पेट्रोल डिझेल बेकायदेशीर धंद्याचे पितळ उघडं पाडण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर पेट्रोल, डिझेल माफियाचा हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण अकोला जिल्हा त खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार अजय प्रभे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर मृतिजापुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बोरगावं (मंजू) पोलीस ठाण्याच्या हद्दीत् येत असलेलेल्या डाळंबी जवळ एका ढाब्या वर सुरु असलेल्या बेकायदेशीर पेट्रोल, डिझेल विक्रीच्या मोठे रॉकेट सक्रिय असल्याची माहिती मिळताच पत्रकार अजय प्रभे या घटनेची माहिती घेत त्याच्ये फोटो व चित्रीकरण करण्यासाठी घटनास्थळी हजर होते. हे पाहताच पेट्रोल, डिझेल माफियाचा टोळक्याने यांना मारहाण सुरू केली. या हल्ल्यात पत्रकार अजय प्रभे गंभीर जखमी झाले आहे. ते कसे तरी या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पत्रकारावर पेट्रोल, डिझेल माफियाचा टोळक्याने हल्ला केल्याच्या घटनेने निषेधार्थ पत्रकार संघटनेच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ह्याचा निषेध करंत हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.