स्मार्ट प्रिपेड वीज मीटर मुळे सर्वसामान्य गोर-गरिबांची लूट: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रॉ. काँ पार्टी
२.१६ कोटी सर्वसामान्य ग्राहकाकडे तर २५.६ लाख उद्योगीक व मोठ्या ग्राहकाकडे स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसविण्याचे होते उद्दीष्ठ
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विज ग्राहकां स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी स्थगिती देण्यायेवजी त्याला कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकारी अभियंता मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.
विज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये २०० युनिटपर्यंत विज मोफत दिली जात असताना, महाराष्ट्रात विज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत. शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत आहे.
देशात २.१६ कोटी सर्वसामान्य ग्राहकाकडे प्री पेड मितर बसविण्याचे उद्दीष्ट होते. २५.६ लाख उद्योगीक व मोठ्या ग्राहकाकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बसविणार होते. स्मार्ट प्री-पेड वीज मीटरचे कंत्राट अदानी पाँवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, माँन्टेकार्ती या चार कंपण्याना कंत्राट देण्यात आले होते. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात आहेत. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते.
मात्र स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझा व त्रास वाढणार आहे. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरकारने नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिचार्ज मीटरच्या फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत, वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी रद्द करावी आणि लोकभावना लक्षात घेऊन पूर्ववत जुने वीज मीटर देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.
यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई मिर्झा, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, नदीम भाई, सुधाकर वाढई, अनिल लांबट, अमोल बोरकर, प्रवीण श्रीवास्तव, अजय पर्बत, पुरुषोत्तम कांबळे, सुनील भूते, किशोर मुटे, राजू भट, प्रशांत येकोणकर, उमेश नेवारे, विनोद बोरकर, अमोल मुडे, राजू मुडे, सुशील घोडे, पंकज भट, मो. शाहीद, साहिल चौधरी, आदित्य बुट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.