अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वणा नदी ही आपल्या हिंगणघाट शहराला मिळालेली नैसर्गिक देण आहे, या जीवनदायिनीचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहे. आज मानवी चुकांमुळे तसेच नदी पात्रात गाळ आणि झाडेझुडपे वाढल्याने नदी मृतावस्थेत चालली आहे.
वणा नदीचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा नाम समाधी स्थळ ते शमसान भूमी या परिसरातील नदीच्या पात्रात स्वच्छता मोहीम राबवन्यात येत आहे. पोकलेन मशीन द्वारे नदी पात्राची स्वच्छता लोक सह भागातून करण्यात येत आहे. यात सर्वांचे सहकार्य लागणार आहे. वणा मायचे उपकार विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आता वेळ आली आहे. याकरिता दिनांक 19 जून रोज बुधवारला सकाळी 9.00 वाजता सर्वांनी नदी संवर्धन मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी ही विनंती करण्यात आलेली आहे.
सर्व सामाजिक संघटना यांनी आमदार समीर कुणावर यांची भेट घेतली व नदी साफ सफाई विषयी चर्चा करण्यात आली. यात आ.समीर यांनी योग्य प्रतिसाद देऊन दोन पोकलेन व एक लाख रुपये कबूल केले आहे. आणि पन्नास हजार रुपये रोख देऊन कार्यास शुभेछा दिल्या.