उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना स्पर्श होतात व त्यामूळे वारंवार मोठा स्पार्क होते विद्युत खांब पुर्णपणे वाकले असुन विद्युत तार लोंबकळत आहेत व नेहमी पाऊस आला किंवा थोडी जरी हवा आली तेव्हा वीज खंडित होते. व नेहमी नेहमी नागरीकांना विजेच्या लपंडाव चा त्रास सहन करावा लागत आहे.
शेळद गावातील नागरिक वीज प्रमाणे लाईट बिल व्यवस्थीत भरतात व महावितरणला सहकार्य करतात. परंतु शेळद गावात वीज पुरवठा बरोबर मिळत नसल्यामूळे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन नविन केबल लाईन वायरची व्यवस्था करुन देण्यात यावी व ज्याठिकाणी विद्युत खांब सुध्दा नाहीत त्याठिकाणी खांब सुध्दा उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्यथा अशोका फाऊंडेशन व बहुजन एकता पॅनल व समस्त शेळद गावातील गावकरी मिळुन महावितरणच्या या भोगंळ कारभारा विरोधात तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी. अशी मागणी अशोका फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिकडे यांनी कार्यकारी अभियंता उपविभाग बाळापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी अय्याज खान, मनिष तायडे, व अशोका फाऊंडेशन व बहुजन एकता पॅनल व शेळद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.