मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील इंदाराम येथील प्रतिष्ठित व्यक्ती शंकर मडावी यांचा मुलगा चि. विनोद यांचा विवाह चिंन्नू आत्राम यांची मुलगी चि.सौ.का. सपना यांच्याशी इंदाराम येथे विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.
यावेळी माजी सरपंच गुलाबराव सोयाम, माजी सरपंच संपत सिडाम, शामराव मडावी, दिलीप मडावी, बाबुराव मडावी, नामदेव तलांडे, लचमाजी सडमेक, सत्यवान मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, विनोद कावेरी, मिलिंद अलोने सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.