गुणवंत विद्यार्थ्यांनाही करण्यात आले सन्मानित, पत्रकार संघाचे वतीने स्व. प्रा. ज्ञानेश्वर वैद्य व स्व. सौ चंद्रकला वैद्य स्मृती आयोजन
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पत्रकार संघ हिंगणघाट च्या वतीने वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांना हिंगणघाट भूषण पुरस्कार तर राष्ट्रीय सायकल पोलोपटू स्व. सत्यशील रेवतकर यांना मरणोत्तर हिंगणघाट रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्थानिक जी .बी .एम .एम. हायस्कूल व मोहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवी डॉ. प्रकाश लाहोटी, बळीराजा बाजारचे संचालक राजू राठी, प्राचार्य सुनील फुटाणे, संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव राजेश कोचर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी वन्यजीवांसाठी काम करणारे वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून हिंगणघाट भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सायकल पोलोपटू स्व. सत्यशील उर्फ बाबू रेवतकर यांचा मरनोत्तर हिंगणघाट रत्न पुरस्कार सुपुत्र स्वप्नील रेवतकर व बंधू प्रा. संदीप रेवतकर यांनी स्वीकारला.
यावेळी तालुक्यातील वर्ग दहावी, बारावी, नीट व जेईई परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तन्वी राऊत, भूमिका खरपाते, यश उईके श्रमीका येसंनसुरे, निकिता रानपरा पूजा झाडे, आचल घाटे, आस्था भाईमारे, ओम ठाकरे, निर्मित डेकाटे, प्रतीक आंबटकर, अजाल्फा नाज सलीम शेख, शिवम गावंडे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सत्कार मूर्तींना उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रा. वैद्य यांनी केले तर संचालन प्रा. रेवतकर यांनी केले. उपस्थितांचे आभार शुभम कोचर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजना करताना भास्कर कलोडे, मुकेश चौधरी, मलक मोहम्मद नईम, केवलदास ढाले, प्रमोद जुमडे, मोहम्मद रफीक, रवी येनोरकर, अब्दुल रज्जाक, रमेश लोंढे, सुरेंद्र बोरकर, शंकर शिंदे आदींनी सहकार्य केले.