राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महानगर मधील विरारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील फुलपाडा येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून. धनश्री आंबडस्कर वय 32 वर्ष असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी प्रियकर शेखर कदम असून विवाहित महिलेने आरोपीला भाऊ म्हटल होत पण आरोपी तिचा प्रियकर निघाला.
विरार पोलीस स्टेशनचा हद्दीत येणाऱ्या फुलपाडामध्ये आंबडस्कर कुटुंब राहत होते त्याच परिसरात राहणाऱ्या शेखरला या महिलेने आपला भाऊ मानलं होतं. त्यात वारंवार शेखर धनश्री हिच्या घरी येऊ लागला आणि यातूनच भयंकर प्रकार घडला. आरोपी प्रियकर शेखर कदम याच्या विरोधात विरार पोलीस स्टेशन येथे कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम याला पहाटे च्या सुमारास बेड्या ठोकल्या असून त्याला आज वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पती रुपेश आंबडस्कर याने दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आणि रुपेश हे दाम्पत्य त्यांच्या 10 आणि 5 वर्षांच्या दोन मुली आणि मेहुणी यांच्यासह विरारच्या फुलपाडा येथील घरात राहत होते. सोमवारी दुपारी 12.17 च्या सुमारास गोरेगाव येथील कंपनीत कामावर असताना रूपेशला पत्नी धनश्रीचा फोन आला. यावेळी तिने त्याला तातडीने घरी येण्यास सांगितलं. मात्र रूपेशने काहीही न म्हणता फोन कट केला. सायंकाळी 5.24 च्या सुमारास रुपेशला त्याच्या शेजाऱ्यांचा फोन आला. पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रूग्णालयात घेऊन जात असल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. हे ऐकून रूपेशला धक्काच बसला. मात्र रुग्णालयात दाखल करताच तिचा रूग्णालयात मृत्यू झाला.
दोघांमध्ये कशावरून तरी वाद मग हत्या..
आरोपी शेखर ज्यावेळी मृतक धनश्रीच्या घरी आला तेव्हा तिचा पती रुपेश कामावर गेला होता. शिवाय दोन्ही मुली शाळेत आणि रुपेशची मेव्हणी देखील कामावर गेली होती. त्यावेळी शेखर घरी आला. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. वादानंतर प्रियकर शेखर कदम याने धनश्रीचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप रुपेशने केला आहे. शेखर कदम हा देखील विवाहित असून तो देखील फुलपाडा परिसरात पत्नी आणि एका मुलीसह राहत होता. याप्रकरणी विरार पोलीस आरोपी शेखर कदम याला पहाटे अटक करण्यात आली असून त्याला आज वसई न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे.