महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिल्ली:- 18 व्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सर्व निवडून आलेले खासदार संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेत आहेत. हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी 18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली. असदुद्दीन ओवेसी यांनीही उर्दूमध्ये शपथ घेतली आणि निघताना “जय भीम जय मिम” चा नारा दिला. पण ओवेसींनी अखेर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा देत लोकसभेत वाद निर्माण केला.
वास्तविक, प्रोटेम स्पीकरने खासदार असासुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचा पाठ करून ओवेसी यांनी खासदार पदाची शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना ‘जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. त्यामुळे भाजपाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.
पाचव्यांदा निवडणूक जिंकून ओवेसी पोहोचले संसदेत.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38087 मतांनी पराभव केला. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत, ओवेसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.
ओवेसी किती वेळा जिंकले : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी 2004 मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदा संसदेत पोहोचले. यानंतर, त्याने 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये आपली विजयी मालिका सुरू ठेवली.