प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय अंतर्गत येणा-या चितोडा रोड बोरगाव मेघे येथील सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 व 12 च्या संगणकशास्त्र अभ्यासक्रमास कोणत्याही प्रकारची शासन परवाणगी, मंडळ मान्यता व खाते मान्यता प्राप्त झाली नसल्याने विद्यार्थ्यांनी या सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालयात संगणक अभ्यासक्रमासासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्यावतीने सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालय येथील संगणकशास्त्र विना अनुदानित या विषयाची पडताळणी केली असता असे निदर्शनास आले की संस्थेने सन 2022-23 व 2023-24 इयत्ता 11 वी 12 वीत विना शासन परवाणगी, विना मंडळ मान्यता व विना, खाते मान्यता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेकडे अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची परवाणगी, मंडळ मान्यता व खाते मान्यता प्राप्त झालेली नाही. येणा-या 12 वी बोर्ड परीक्षेत (फेब्रुवारी 2025 मध्ये) प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील इतर मान्यता प्राप्त महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा. जेणे करुन भविष्यात विपरीत परीणाम होणार नाही याची दक्षता पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.