प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील गिरड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीचा सोशल मीडिया अश्लील व्हिडिओ अपलोड करुन विनयभंग केल्या प्रकरणी मुंबई येथील राहणाऱ्या बबलू खान यांचा विरोधात गिरड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील आरोपी बबलू खान यांनी तरुणीच्या समाज माध्यमाच्या फेसबुकवर फ्रेड रीक्वेस्ट पाठवून तिचेशी मैत्री केली व सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅसेज पाठवून जवळीकता साधली. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲप वर व्हिडिओ कॉल करुन तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला धमकवल आणि आरोपींनी इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईड वर ते अश्लील व्हिडिओ अपलोड करून बदनामी केली.
याची माहिती मिळाल्यानंतर पिढीत तरुणीने गिरड पोलीस स्टेशन गाठत मुंबई येथील राहणाऱ्या आरोपी बबलू खान यांच्या विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोप बबलू खान यांच्या विरोधात तक्रार दाखल करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गिरड पोलीस करीत आहे.

