महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तराखंड:- मधून एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं देश हादरला आहे. यावेळी या मुलगी मदतीसाठी आपल्या प्रियकराकडे गेली त्यावेळी या नराधम प्रियकराने ही तिचे लचके तोडले त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्याकांदाचे पोलिसांनी 48 तासात खुलासा करत एका महिला सह 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. तर भाजपा नेत्यासह 3 आरोपी आता पर्यंत फरार आहे. पोलिसांनी हा घटनेची गुत्थी खोलण्यासाठी 400 पेक्षा जास्त सीसीटीवी कॅमेरे तपासले आणि 600 पेक्षा जास्त सीडीआर चेक करून हे हत्याकांड उजागर केले.
24 जून सोमवारी सकाळी हरिद्वार येथील नामांकित आयूर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूटजवळ असलेल्या परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नागरिकांना दिसला. रात्री अंधारात एखाद्या कारखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांना वाटले. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. आणि पोलीस आपल्या फौज फात्यासह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलीस तपासात हा मृतदेह शांतरशाह गावातील मुलीचा असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसांनी कडून तपास केला असता अनेक खळबळजनक खुलासे झाले आहे. त्यात भाजपचा पदाधिकारी, दगाबाज प्रियकर, त्याचे वासनांध मित्र या सर्वांनी मिळून एका मुलीचा कसा जीव घेतला याचा अंगावर शहारे आणणारा घटनाक्रमच समोर आला.
हरिद्वार जवळ असलेल्या शांतरशाह गावात राहणाऱ्या एका 13 वर्षांची मुलगी तिच्या मित्राच्या वाढदिवासाठी बाहेर गेली होती, मुलगी अजून पर्यंत घरी आली नाही म्हणून रात्री 11 वाजताच्या सुमारास आईने तिला फोन लावला. पण मोबाईल फोन स्विच ऑफ आला. त्यामुळे आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर आईने मुलीचा मित्र असलेल्या अमितला फोन केला. अमितने ती वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे, उद्या सकाळी घरी येईल असे सांगितले.
रात्र उलटली आणि सकाळ झाली तरी आपली मुलगी घरी न आल्याने आईने शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सकाळी आई भाजपचा नेता ओबीसी महामंडळाचा सदस्य असलेल्या आदित्य राज सैनी याच्या घरी गेली. त्याने यावेळी मुलीच्या आईला सांगितले की ‘सध्या पोलिसांकडे तक्रार दाखल करू नका’. त्यांनतर हताश झालेली आई घरी परतली.
संध्याकाळी मुलीच्या आईला भाजपा नेत्या आदित्यचा फोन आला. तुमच्या मुलीचा हरिद्वारजवळ रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे आदित्यने सांगितले. मुलीच्या मृत्यूमुळे आईला मानसिक धक्का बसला होता. अमित गेल्या सहा महिन्यांपासून मुलीचे शोषण करत होता आणि त्यानेच मुलीची हत्या केली असावी, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला.
जबरदस्तीने दारू पाजली मग सामूहिक बलात्कार: अमित सैनी हा आदित्य सैनीचा चूलत भाऊ आहे. अमितचे गावातील 13 वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या कुटुंबियांनाही अमितने धमकावले होते. रविवारी संध्याकाळी अमितचा मित्र नितीन वय 20 वर्ष याने मुलीला भेटण्यासाठी कॉल केला. नितीन बाईकवरून त्या मुलीला घेऊन निघाला. महामार्गावर तुषार वय 20 वर्ष आणि मौसम वय 19 वर्ष हे दोघे जण भेटले. तिथून चौघेही मद्यपानासाठी निर्जनस्थळी गेले. तिथे मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
त्यानंतर रात्री उशिरा पीडित मुलगी रडत रडत तिचा प्रियकर असलेल्या अमितच्या घरी गेली. त्यानंतर नराधम अमितनेही तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी असल्याने आपल्या विरोधात पोलीस तक्रार दाखल होऊ शकते, असे अमित आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात आले. तिथूनच पीडित मुलीच्या हत्येचा कट रचला गेला. अमित आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडितेला अमानूष मारहाण केली. ती बेशुद्ध झाल्यावर अमित तिला कारमधून महामार्गावर घेऊन गेला. महामार्गावर तिला कारसमोर ढकलून दिले आणि तिथून पळ काढला.