संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 2 जुलै:- राजुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असलेले दत्ता बालू चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वतः पासून आणि स्वतःचा परिवार सोबतच आपल्या कार्यक्षेत्रातही दत्ता चव्हाण वेगवेगळ्या प्रसंगी वृक्षारोपण करीत असतात. अत्यंत धावपळीच्या व व्यस्त कार्यक्षेत्रातही ते पर्यावरण संवर्धनाचा ध्यास जपतात.
नुकताच त्यांच्या मुलाचा प्रियांशु चा तिसरा वाढदिवस होता तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती चे अवचित्य साधत आंबा, फणस, बदाम या फळझाडांचे वृक्षारोपण त्यांनी केले. कामाचे क्षेत्र असो की घराजवळील परिसर चव्हाण यांनी वृक्षारोपनाचा ध्यास जपला आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून बालवयातच आपल्या मुलाला वाढदिवस वृक्षांच्या सानिध्यात साजरा करून त्याला वृक्षांचे महत्व पटवून दिले.