प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांची पदाधिकारी आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडली. यावेळी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी स्तविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच यावेळी सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी गणेश जोशी, माजी मुख्याध्यापक राजुजी अतकर यांच्यासह शहरातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश उपाध्यक्ष किशोर माथनकर, कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, युवती जिल्हाध्यक्ष माधवी पाटील, वासुदेव गौळकार, संजय हिवलेकर, सैनिक दल जिल्हाध्यक्ष पुंडलिक बकाने, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, ओमकर मानकर, गजानन शेंडे, गणेश वैरागडे, मिर्झा हुमायु बेग, शोहेब शेख यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.