महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- राज्यातील हाथरस येथून संपूर्ण देशाला हादरविणारी घटना समोर आली आहे. येथे भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगरा चेंगरी झाली. यामध्ये 122 जणांचा मृत्यू झाला. 150 हून अधिक जखमी आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. हातरस जिल्ह्यापासून 47 किलो मिटर अंतरावर असलेल्या फुलराई गावात ही घटना घडली.
फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी नंतर परिसरातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह रास पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी पोलिसांनी हाथरसमध्ये मृतदेहांची मोजणी केली असता. येथे 95 मृतदेह पडलेले आहेत. त्याच वेळी, एटा सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले – आतापर्यंत हाथरस मधून 27 मृतदेह एटामध्ये आणले गेले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. सत्संगात 20 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती.
चेंगराचेंगरी नंतर जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनाने बस – टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी इतके जखमी एकाचवेळी रुग्णालयात पोहोचले की लोकांना हॉस्पिटलच्या बाहेर जमिनीवर झोपवून उपचार सुरू करण्यात आले.
चेंगराचेंगरी का झाली?
सत्संग संपले त्यानंतर संपूर्ण लोक एका सोबत बाहेर निघाले होते. जिथे हा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो हॉल छोटा होता. गेटही छोटे होते. त्यामुळे बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर तुडवत बाहेर जाण्यासाठी धडपडत होते. त्यात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुले होती. यामध्ये 150 हून अधिक लोक जखमी झाले आहे. तर शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहे.