राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राज्यात लेक लाडकी योजना सरकारने आणली. त्यामुळे सरकारी कार्यालयात महिलांची भिड बघायला मिळत आहे. त्यामुळे लेक लाडकी योजनेच्या कालावधीत वाढ करून जाचक अटी रद्द करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने गोंडपिपरी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
सध्या शेती हंगामाचा काळ आहे. महिला रोजीरोटी सोडून लेक लाडकी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कागद पत्रे जुळवण्याच्या कामात लागल्या आहेत. अशावेळी जन्मदाखले मिळवण्यासाठी तालुका स्तरावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जनमाच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर हस्तांतरीत कराव्या. सोबत योजनेची कालावधी वाढवावी. प्रशासनाने कागदपत्र तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करावी. अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे करण्यात आली यावेळी आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार, काँगेस तालुका कार्याध्यक्ष बाजार समिती संचालक निलेश संगमवार, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक देवीदास सातपुते,काँगेस शहर अध्यक्ष राजू झाडे,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते, शिवसेना शहर प्रमुख विवेक राणा, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नीतेश मेश्राम, युवक तालुका अध्यक्ष नरेश तूमडे, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कोसणकर यांची उपस्थिती होती .