प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाटसाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे म्हणून शहरात आंदोलने आणि विरोध सुरू असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथेच व्हावे म्हणून वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन दिले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा यांच्या वतीने आज वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदनातून मागणी केली आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा येथील प्रस्तावित जागीच व्हावे. याकरिता शिष्टमंडळा द्वारे निवेदन सादर करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया बद्दल चर्चा करत असताना जिल्हाधिकारी यांनी हे प्रस्तावित जागेला घेऊन सकारात्मक दिसून आले असून त्यांनी सांगितले की जागा निर्धारित करण्यासंदर्भात काही निकष असतात त्या अनुषंगाने ती जागा योग्य आहे असे निदर्शनास आल्यामुळे या जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला. निकष निर्धारित करण्यासाठी काही तज्ञ शासकीय प्रशासकीय कमिटी येऊन सुचवलेल्या विविध जागेचे निरीक्षण करून जागा निश्चित करतात. निकष लक्षात घेता वेळा येथील जागा योग्य आहे असे निदर्शनात आले. म्हणून ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून वेळा ही जागा देण्यात यावी याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा यांनी निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा देखील दिला की जर महाविद्यालय वेळा इथून दुसरीकडे स्थलांतरित किंवा स्थगित करण्याचा प्रयत्न झाला तर वेळा व त्या लगत असलेल्या अनेक गावातील गावकरी चक्काजाम आंदोलन व भव्य जनआक्रोश मोर्चा उभारणार असे सांगितले.