अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २ जुलै:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. खिस्से गरम करून अवैधरित्या फेरफार केल्याप्रकरणी तलाठी शरद नांदुरकर याला निलंबीत करण्यात आल्याने संपूर्ण सावनेर शहरात खळबळ उडाली आहे. तलाठी शरद नांदुरकर हा आपले खिसे गरम केल्यानंतर नागरिकांचे काम करायचं अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.
सावनेर तालुक्यातिल मौजा बिड जटामखोरा येथील फेरफार पंजी मधील नोंद क्रमांक ६०७ ते ६१५, ६३२, ६२८ व ६५८ मध्ये सर्वे नंबर १६५, १६६/२ १६८, १७२ अनुसार पुर्वश्रमीच्या ज्या नोंदी तत्कालीन उपविभागीय अधिकारी सावनेर यांनी अनोंदणीकृत तथा तुकडेबंदी कायदयाचा भंग होत असल्याने रद्दबदल ठरविण्यात आला होता. त्यामध्ये नांदुरकर यांनी जाणीवपूर्वक सर्व माहित असतांना देखील त्यात चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या फेरफार घेवून वाम मार्गाचा अवलंब करून त्यांनी शासकीय कामात सचोटी व कर्तव्यपरायणता न राखुन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तहसिल कार्यालय सावनेर चे केळवद सर्कल मंडळ अधिकारी शरद नांदुरकर यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ मधील उप नियम (१) अ) अन्वये शासन सेवेतुन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
ज्या तलाठ्याने हे फेरफार व्यवस्थित आहे म्हनत त्या तलाठ्यांनी मनमानी पैसा घेवुन संगमत करुन ते सर्व फ़ेरफार घेतलेले आहे. अश्या रुपये पैसा घेणाऱ्या व तसेच वरिष्ट उपविभागिय अधिकारी यांचा आदेशाला न जुमानणाऱ्या तलाठीवर तात्काल कार्यवाही करावी अशी नागरीकाकडून मागनी होत आहै.
दूसरा प्रकार मौजा मालेगाव (जो) येते घड़विला. पत्नीचा नावाने शेती खरेदी केली व त्याचें ७/१२ वर पत्नीचे नाव न चढ़विता त्या शेतातील चक्क मुरूम परस्पर विकुन टाकला नाव विक्रीदाराचे केले त्यावेळेस सुद्धा हाच मंडल अधिकारी पदावर कार्यरत होता. परन्तू स्वताचा पत्नीवर कोणत्याच प्रकारची कार्यवाही होवु दिली नाही उलट तिला त्या प्रकरनातुन वाचविले. या मंडल अधिकाऱ्याने स्वता जेसीबी व ट्रक़ मालका सोबत संगमत करुन मुरूम उत्खनन करुन तो चक्क बाहेर विकलेला आहे. या प्रकरणात त्या मंडल अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग केलेला आहे.
याच प्रकरणाची सुद्दा मुरुम उत्खनन करणाऱ्यांनी स्वताच अपिल केला अपिल उपविभागीय अधिकारी सावनेर यांचा कड़े सुरु आहे. यात उपविभागीय अधिकारी सावनेर हे त्यांना वाचवतील का? त्यांना मदत करतील का? याकडे सर्व विदर्भ, नागपुर जिल्हा व सावनेर तालुक्यातील नागरीकांचे याकडे लक्ष लागले आहे.