युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे यात. नुसतेच शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. शाळेत स्वच्छतागृहात गेल्यानंतर वीजेचा शॉक लागल्याने पहिलीतील चिमुकल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. यशस्वी सोपान राऊत वय 6 वर्ष असे या चिमुकलीच नाव असून हा घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या यशस्वी सोपान राऊत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पुयार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिचा प्रवेश करण्यात आलेला होता. नुसतीच शाळा सुरू झाली होती. बुधवारी 3 जुलैला मृतक यशस्वी सकाळी शाळेत गेली. तेव्हा शाळेत लावण्यात आलेल्या RO पाणी फिल्टर मशीनचा वायरचा करंट लागला. यात ती स्वच्छतागृहातच बेशुद्ध होऊन पडली.
या घटनेची माहिती मिळाताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिलं मृत घोषित केलं. शाळेला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असतानाच मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.