विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- आज दि. 3 जुलै रोजी सुमारे दुपारी 12 वाजताच्या सुमारास संकेत पुल्लूरवार यांनी राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे सचिव मनीष ढाली यांना फोन करून एटापल्ली ते कसनसूर मार्गांवर तोडसा नाल्या जवळ अपघात झाल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच कश्याचाही विचार न करता लगेच मनीष ढाली व राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार लगेच त्यांची रुग्णवाहीका घेऊन अपघात स्थळी पोहचले दोन दुचाकी वाहन समोरासमोरून धडक दिली असल्याने एकूण 5 व्यक्ती जखमी झाले त्यामध्ये लक्ष्मण कवडो रा. मोहुर्ली, नागेश पुंगाटी रा. कुद्री, संतोष आलामी व रेखा आलामी रा. नागूलवाडी, अनिल तलांडे रा. पंदेवाही ता. एटापल्ली येथील रहिवासी आहेत सगळ्यांची स्थिती ठीक असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे सोडून देण्यात आले.
सदर रुग्णांना मदत करते वेळी आदित्य चिप्पावार, प्रसंजित करमरकर व आदी नागरिक उपस्थित होते. ग्रामीण भागात कार्य करणारी ही फॉउंडेशन ग्रामीण भागातील रुग्णांन करिता ठरत आहे देवदूत.