अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सोन्या चांदीचे व्यापाऱ्याला लाखों रुपयाने लुटल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. ही घटना दिनांक 5 जुलै रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वर्धा हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वरील क्रॉसिंग जवळ घडली.
वडनेर येथील व्यावसायिक सोन्या चांदीचे व्यापारी आपले वडनेर येथील दुकान बंद करून आपल्या हिंगणघाट येथील निवासस्थानी परत येत असताना रात्रीच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी सुभाष विनायक नागरे वय 43 राहणार संत तुकडोजी वार्ड यांच्या जवळील सोने चांदी आणि नगदी 71 हजार रुपये 221 ग्राम सोने असा 13 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
अंधाराचा फायदा घेत दोन चोरट्यांनी त्यांना अडविले व तिसरा त्यांना वाचविण्या करिता आल्याचा बनाव करत तिघाही चोरट्यानी त्याच्या जवळील बॅग घेऊन दुचाकी वर पसार झाले. यादरम्यान झटापटीत सोनाराला पायावर चाकूने वार सुद्धा करण्यात आला. त्यात सुभाष विनायक नागरे हे जखमी झाले आहे.
हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या बाबत हिंगणघाट पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे