पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दिनांक 5 जुलै शुक्रवारला वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही घटना वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात 5.00 वाजताच्या सुमारास घडली.
पुण्यात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वाहतूक एपीआय शैलेजा दराडे – जानकर आणि पोलीस कर्मचारी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रंक आणि ड्राईव्हची तपासणी करत असताना संजय साळवे हा बाईकस्वार ब्रीथ ॲनायलायझर टेस्टला नकार देऊन गोंधळ घालू लागला. म्हणून पोलिसांनी त्याला फरासखाना चौकीत आणलं असत त्याने नजर चुकवून एका छोट्या बाटलीत बाहेरून पेट्रोल भरून आणलं आणि थेट महिला पोलीस अधिकारी शैलेजा दराडे जानकर यांच्या अंगावरच ओतलं आणि लायटरने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीय. संजय फकीरा साळवे याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
आरोपी या घटनेबाबत काय बोलला ? हा आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. तो मूळचा जालन्याचा असून पिंपरीत डंपर चालवायचा. पण मध्यतरी त्याची नोकरी गेल्याने तो नैराश्यात होता, अशी माहिती मिळतेय. नैराश्य एकवेळ समजू शकतो, पण म्हणून थेट महिला पोलीस अधिकाऱ्यावरच थेट पेट्रोल टाकण्याचा प्रकार पुण्यात कदाचित पहिल्यांदाच घडतोय. म्हणूनच या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. वाहतूक महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्यास पेटवून देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपी संजय फकीरा साळवे याला कोर्टात हजर करण्यात आलं. पुणे न्यायालयाने आरोपी साळवे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
नेमकी काय घडल तिथे?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यानची ही घटना आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार चौकात ही घटना घडली. वाहतूक नियमन करत असताना एक महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांनी एका संशयित वाहनाला रोखले. त्यावरुन वाहन चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना कारमधून एक व्यक्ती उतरला आणि त्याने महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले.