अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- काल झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगडावर परिस्थिती चिंताजनक झाली होती, रायगड चे पायरी मार्गावर मध्ये लागणाऱ्या धबधब्याने विक्राळ रूप घेतले त्यामुळे तिथे आलेल्या पर्यटकांना रस्ता ओलांडणे अशक्य झाले होते, पाण्याचा प्रवाह खूप असल्या कारणाने जवळपास 400 पर्यटक अडकले होते.
यावेळी अडकले पर्यटकाना दुर्गभटकंती ग्रूप म्हैसबाड चे सदस्य राजेश हरिश्चंद्र पाटील, दीपक शंकर गायकर व भावेश लक्षम धुमाळ आणि इतर तिथे आलेल्या सहकाऱ्यांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप रस्ता पार करून रायगड च्या ला पायथ्याला आणले, त्यांच्या या जिद्दीच्या कार्याला तेथील अडकलेल्या पर्यटकांनी आभार मानले तसेच त्यांचे आता गावातून सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.