संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश्याध्यक्ष कृणाल दादा राऊत यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस (ग्रामीण) ची आढावा बैठक पार पडली.
यावेळी महाराष्ट्र युवा काँग्रेस द्वारा आयोजित ”पंचायत चलो अभियान” , ”वॉर्ड चलो अभियान”, नवीन मतदार नोंदणी अभियान व सध्या महाराष्ट्रभर शासनाद्वारे राबविण्यात येत असलेली ”माझी लाडकी बहीण योजना” या संदर्भात चर्चा व याचा लाभ कशा प्रकारे सामान्य जनतेला मिळवून देता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आली.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसची भूमिका आणि तयारी यावर मंथन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष कृणाल दादा राऊत होते तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, महाराष्ट्र प्रदेश यु. काँ. चे महासचिव कृणाल चहारे, अमुरी नुरी,असिफ शेख, सचिव शुभम गिरटकर, चंद्रपूर यु. काँ. शहर प्रभारी फाडलूर कुरेशी, निलेश खोब्रागडे, जिल्हा यु. काँ. चे उपाध्यक्ष प्रणय लांडे, महासचिव आकाश मावलीकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चंद्रपुर जिल्हा युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनू दादा धोटे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, त्या सोबत मागील लोकसभा निवडणुकीतील आपला युवकाचा असलेला वाटा या बद्दल विस्तृत अशी माहिती प्रदेश्याधक्ष आणि कार्यकर्त्याना दिली. सोबतच सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचे, महाराष्ट्र युवक काँग्रेस द्वारे दिलेल्या सूचनांवर एकजूटीने काम करीत पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे जिल्हातील सहाच्या सहा विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू अशी ग्वाही दिली. यानंतर राजुरा तालुका यु. काँ. अध्यक्ष इर्शाद शेख यांनी नवीन मतदार नोंदणी ,माझी लाडकी बहीण नोंदणी बद्दलचे आपले राजुरा काँग्रेस कार्यालयात सुरू असलेले अनुभव सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश्याध्यक्ष कृणाल दादा चहारे यांनी युवक काँग्रेस काँग्रेस पक्षाची रक्तवाहिनी असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक ऊर्जावान होऊन कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी घनश्याम मूलचंदानी यांनीं सुद्धा आपले अनुभव सांगितले.
या आढावा बैठकीत युवक काँग्रेसच्या पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदी कुमारी देवयानी रणदिवे व बल्लारपूर तालुकाध्यक्ष पदी इटोली येथील उपसरपंच नरेश बुरांडे यांची निवड करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश गोनेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.