वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने ‘संजय कांबळे’ यांचे आमरण उपोषण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव, विवेक कुंभार यांच्या लेखी पत्र पाठवून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने स्थगित.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि. १०:- वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिनांक ८ जुलै २०२४ रोजी पासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अमरण उपोषण सुरू केले होते. आज दिनांक १० जुलै २०२४ उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या लेखी आश्वासनाने व सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चे करता मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात बोलवले असल्यामुळे लेखी पत्र दिले असल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेले तीन दिवस आमरण उपोषण करणारे, संजय भूपाल कांबळे यांचे उपोषण हे सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळोखे तसेच निरीक्षक श्रीकांत मंतनावर, रोहित गोरे यांच्या हस्ते संजय कांबळे यांना सरबत पाजून उपोषण थांबविले, यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी, 15 जुलै २०२४ रोजीच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव यांच्या बैठकीमध्ये सदर मागण्यासंदर्भात तात्काळ आदेश प्राप्त न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा येईल तसेच होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत कांबळे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोषाध्यक्ष हिरामण भगत सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे, राजेश गायगवाळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, उपाध्यक्ष जितेंद्र कोलप, विशाल कांबळे, किशोर आढाव, सतीश शिकलगार, संदीप कांबळे, विवेक तोरवे, बंदेनवाज राजरतन, उमरफारूख ककमरी, रमेश कांबळे, महेंद्र गाडे, दिलीप गाडे, सुरेश आठवले, रविंद्र ढाले, शिवाजी त्रिमुखे, विशाल धेंडे, उषाताई कांबळे, दिपाली वाघमारे, दादासो सदाकळे, सचिन मोहिते, रफिक मुजावर, सुभाष पाटील, लक्ष्मण वडार, नबीसाहेब नदाफ, साजिद सय्यद, अस्लम सय्यद,ओबेलस मद्रासी,यशया तालुरी, अभिजित आठवले, विनोद कोळी यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.