युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका हिंगणा मीटिंग किनी तालुका हिंगणा येथे परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे व विदर्भ प्रमुख शाहीर यादवराव कानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष नामदेवराव ठाकरे, रामचंद्र नाडेकर, प्रसिद्धीप्रमुख युवराज मेश्राम, जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या मिटींगचे प्रमुख आयोजक पुरुषोत्तम निघोट यांनी गुलदस्तांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याचे प्रास्ताविक पुरुषोत्तम निघोट यांनी केले. विदर्भ प्रमुख शाहीर यादवराव कानोलकर, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी कलावंताच्या समस्या यावर प्रकाश टाकला. सर्वानुमते खालील हिंगना तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम निघोट, कार्याध्यक्ष बाबाराव निघोट, सचिव नानाभाऊ उमाळे, कोषाध्यक्ष कमलाकर उईके, सहसचिव रवींद्र चाकुंदे, संघटक पंडितराव चाकुंदे, कार्याध्यक्ष माणिकराव भोपे, हिंगणा तालुका कार्यकारणी सदस्य सुधाकर निघोट, घनश्याम अवचट, रुपेश निघोट, रत्नाकर निगोट, अशोक बेंदले, रामचंद्र उमरेडकर, पांडुरंग चाकूनदे, रामदास निगोट, सेवकराम निघोट, महिला प्रतिनिधी शांताबाई डाखरे, चंदाताई बावणे, आशाताई निघोट, संध्याताई निघोट, सुनिताताई निघोट, प्रभाताई चाकूनदे, मंदाताई निघोट, रुखमाताई चाकूनदे, शेवंताबाई नीघोट, शोभाबाई उमरेडकर, निर्मलाबाई निघोट अशी एकूण 31 कलावंताची जम्बो कार्यकारणी याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने यांच्या देखरेखित झाली. यावेळी नवनियुक्त तालुका कार्यकारणीचे स्वागत विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमालेने करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नानाभाऊ उबाळे यांनी केले. याप्रसंगी शंभरच्या वर पुरुष व महिला कलावंत उपस्थित होते.