पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी.
दिनांक १८/०९/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट १च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना स्टाफ मधील पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दिनांक ०९ एप्रिल रोजी कासेवाडी भागात आतिष लांडगे याने त्याचे हातात कोयता घेवुन वाढदिवसाचा केक कापुन आरडा ओरडा करत राडा केला त्याचा व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर टाकल्याची बातमी मिळाल्याने बातमीचा आशय वरिष्ठांना कळविला.
वरिष्ठांच्या परवानगीने स्टाफ सह कासेवाडी भागात पंचा सह जावुन छापा घालून सदर इसमास काशिविश्वनाथ महादेव मंदिरा समोर काशेवाडी पुणे येथे ताब्यात घेवुन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव आतिष जालिंदर लांडगे वय २६ वर्षे रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा मागे काशेवाडी पुणे त्याचे कडुन एक लोखंडी कोयता ५००/- रु किमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २८४ / २०२२ आर्म अॅक्ट क ४ (२५) व महा.पो.अधि क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आला असुन सदर आरेपीस पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांन मध्ये रात्रीचे वेळी चौका-चौका मध्ये गर्दी करून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार चालु झाले आहेत आणि त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयता सारख्या मोठमोठ्या बेकायदेशिर हत्याराने कापले जातात त्याचे व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर ठेवले जातात त्यावर आळा बसविण्या करिता सदरप्रकारा वर लक्ष तेवुन गुन्हे शाखा युनिट १ कडुन कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, गा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, गा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे- श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले, सहा. पो निरीक्षक आशिष कवठेकर, पो. उप निरीक्षक अजय जाधव, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, सोनवणे, अनिकेत बाबर यांनी केली आहे. अजय थोरात, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर यांनी केली आहे.
