मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संबंधित उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे असलेली जमीन सांस्कृतिक सभागृहसाठी वापरण्यास आकस्मिक मोजणी नगरपालिकेने केल्यासंबधी तसेच ती मोजणी चुकीच्या ठरवा अंतर्गत केल्या संबंधित आज हरिओम सभागृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे होऊ नये यासाठी हा प्रयत्न होता असा आरोप माजी आमदार राजू तीमांडे व संघर्ष समितीचे अध्यक्ष पिंपळकर, आणि इतर ह्यांनी केले.
हिंगणघाट येथे मोठ्या प्रमाणात राजकीय
उथलपुथल सुरू असलेली दिसत आहे. त्यामध्ये एक मोलाचे वळण म्हणजे आकस्मिक झालेली सर्वे नं.१९४, १९५ व १८५ ह्या जागेची मोजणी नगरपालिका मार्फत १५ हजार रुपये भरून भूमिअभिलेख विभागाला ताबडतोब एका दिवसात मोजणी करायला भाग पाडले गेले. ह्याच्यात नगरपालिका मुख्याधिकारी, भूमिअभिलेख उपअधीक्षक संशया भोवऱ्यात येतात. म्हणजे हे लोक जनतेचे अधिकारी आहेत की लोकप्रतींनीधीचे अधिकारी आहेत.
हिंगणघाट नगरपालिका स्वतः ठराव घेऊन लोकांच्या स्वर्थाशी खेळत आहे आणि त्यातही स्वच्छतेचा ठराव घेऊन तो ठराव अंतर्गत सभागृहात साठी मोजणी केली गेली हे आश्चर्य. त्यातही हा ठराव मुळात संशयास्पद आहे. कारण ठराव, पैसे भरणे आणि मोजी सर्व एकाच दिवसात केले गेले. सामान्यतः ह्या कामाला जनतेद्वरा महिने लागतात. अशी चर्चा येथे झाली. उपजिल्हा रुग्णालय हिंगनघाटला लागून असलेली सरकारी जमीन (महसूल विभाग व नगरपालिका आरक्षण) लागून असताना सुद्धा अजूनपर्यंत शासकीय महाविद्यालयासाठी मंजुरी ना देता सभागृहासाठी आकस्मिक (आणि संशयित) मोजमाप केल्या प्रकरणी व त्या निषेधार्थ सोमवार दी.२२ जुलै पासून महिलांचे आमरण उपोषण घोषित केले गेले आहे.
ह्यावेळी माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, जगदिश वांदिले, अनिल भोंगाडे, संदेश मून, सुरेंद्र बोरकर, सुनिल हरगुडे, शशिकांत वैद्य, राजु मुंडे, दशरथ ठाकरे, अमीत रंगारी, सोनु कौरीसीया, शितल तिवारी, सुजाता जांभुळकर, रागिणी शेंडे, दिपाली रंगारी, सिमा तिवारी, सुनिता तामगाडगे, आचल वकील, सुनिता तळवेकर, सुजाता जिवनकर, गिता मेश्राम, रत्नमाला टापरे, माया भोयर, मंदाकिनी ढाले, सविता गिरी, सुनिता गुजरकर, सुनीता तायवाडे, विजया आगबत्तलवार इत्यादी उपलब्ध होते.