सावनेर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी गेडाम यांचा निलंबनाची मागणी.
अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर शहरात दिवसेन दिवस चोरीचे प्रकरण वाढत चालले आहे.यावर अंकुश लावणे तर दूर परंतु गुन्हेगारी करणारे चोरटे यांना नागपूर गुन्हे शाखेचा पोलिसांनी पकडून सावनेर पोलिसांचे मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस आणले. त्यावर सावनेर येथे पहाटे 4 वाजताच्या सुमारास 3 मोबाईल शॉपी येथे चोरी करणाऱ्या चोरांना नागपूर गुन्हे शाखेचा पोलिसांनी सावनेर पोलिसांचा स्वाधीन केले.या संपूर्ण चोरीचा तपास सावनेर पोलीस स्टेशनचे पीएसआय स्वप्नील गेडाम यांचा कडे आहे.
घटनेचा दिवशी तुळजाई मोबाईल शॉपचे मालक योगेश पाटील हे घटनेची माहिती देत असतांना गेडाम यांनी त्यांचा सोबत तू तू मै मै केली त्यामुळे पाटील तेथून निघून गेले. त्यानंतर दिनांक 14 जुलै रोज रविवारला सकाळी 11 वाजता त्याच्या सुमारास साई मोबाईल गॅलरीचे मालक विरखरे यांनी पाटील यांना कॉल केला व आपल्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरांना सावनेर पोलीस स्टेशनला आणले असल्याचे सांगितले.
काही वेळानंतर पाटील सावनेर पोलीस स्टेशनला गेले असता चोरांना स्टेशन डायरीच्या मध्ये ठेवले होते पाटीलला बघतात चोरट्यांनी पाटील यांना शिवीगाळ करणे सुरू केले तसेच तेरे दुकानचे हमने कोई भी डेमो मोबाईल चुरया नही तेरे को देख लेंगे तेरा पत्ता कहा का है तुमने हमारे गेडाम साहेबको गलत बोला अश्या प्रकारची धमकीवजा भाषा बोलू लागली या प्रकारची भाषा करत असताना पोलीस स्टेशनमध्ये असलेली सर्व पोलीस मंडळी बघायची भूमिकेत गप्प होते महत्त्वाची म्हणजे तपास अधिकारी श्री गेडाम हे सुद्धा तिथे उपस्थित होते.
पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पाटील तिथून निघून गेले परंतु पाटील यांना याबाबत संशय आला की त्यांच्यासोबत असे का झाले स्टेशनला पोहोचतात पाटील यांना चोरांनी असे का म्हटले याची माहिती गुप्तपणे घेतली असता ते स्फोटक माहिती मिळाली पाटील यांना पोलीस स्टेशनला तपास अधिकारी श्री गेडाम यांच्यामार्फत स्पेशल बोलावून चोरांना सांगण्यात आले होते की अभि एक मोबाईल का मालक पोलीस स्टेशन मे आयेगा उसको गाली देकर धमकी देना, ये साला दुकानमे ज्यादे बज रहा था ईसकी अकड उतारना है. हे ऐकून पाटील यांच्या पायाखालची जमीन निघाली . गुन्हेगारांपासून रक्षण करणारे आज चोरांसोबत असल्याचे पाहून नागरिकांनी कुणाला रक्षण मागावे अशा अटल चोट्यांसोबत अशा अधिकारांची सलोख्याचे ही संबध असू शकतात का…? असा प्रश्न निर्माण झाला आहे ज्या मोबाईल दुकानात चोरी झाली मालकांचे लाखोंची नुकसान झाले त्याच्यासोबत पोलीस अधिकारी अरेरावी करतात व बदला घेण्याकरता चोरांचा सहारा घेतात अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे करावे अशी मागणी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे व सावनेर व्यापारी संघातर्फे केली आहे असे न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले व व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन यांनी दिला आहे.
पत्रकार संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करा किशोर धुंडेले: स्थानिक प्रसिद्ध मराठी वु्त्तपत्राचे प्रतिनिधी तसेच मोबाईल व्यवसायी यांना तपास अधिकारी स्वप्निल गेडाम यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल चोरीच्या घटनेतील आरोपी कडुन ठाण्यातच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यास प्रवु्त्त करणारे पीएसआय स्वप्नील गेडाम यांना तातडीने निलंबित करुण सदर दोन्ही मोबाईल चोरट्यांसह पीएसआय स्वप्निल गेडाम यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नागपुर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार तसेच राज्याचे गु्हमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे लक्ष्मीकांत दिवटे, दिपक कटारे, निलेश पटे, तेजसींग सावजी, प्रा. योगेश पाटील,विजय पांडे, रितेष पाटील, मुकेश झरबडे, प्रा. विजय टेकाडे, धिरज अंतुरकर तसेच व्हाईस आँफ मिडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते