प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील तेलंग पेट्रोलपंपाच्या मागे एका घरातील मागच्या बाजूला विना कठड्याच्या असलेल्या विहीरीत एक गाय पडली. तर त्याच वेळी बस स्थानक येथील सहा ते सात फूट खोल खड्डयात दुसरी गाय पडली. आणि मग एकच धावा धाव सुरु झाली.
जीवावर उदार होऊन विहिरीत पडलेल्या प्राण्यांना बाहेर काढण्यात मास्टर असलेल्या दीपक जोशी व वन्य जिवरक्षक राकेश झाडें यांनी आपल्या सहकाऱ्यासह या दोन्ही गाईना काल दि 8 जुलैला सुखरूप बाहेर काढले.
येथील तेलग पेट्रोल पंपाच्या मागे राहत असलेल्या अमोल काळे यांच्या घरातील मागील जागेत विहीर आहे. घराचे फाटक उघडे असल्याने रात्री एक गाय त्यां फाटकातून आत शिरली आणि कठडा नसलेल्या विहिरीत ती पडली. एकाच वेळेला ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. पहिल्या प्रथम बस स्थानक परिसरातील गाय सुखरूप बाहेर काढण्यात आली. तर दुसरीकडे 50 फूट खोल व दोन माणूस पाणी असलेल्या विहिरीतून त्यां गायीचा जीव वाचविण्याचे मोठे आव्हान रेस्कयू टीम समोर होते. परंतु विहिरीत उतरून अनेक प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा अनुभव असलेले दीपक जोशी यांनी एका मोठ्या दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरले. गायीला दोरी व बेल्ट बांधून हायड्रा मशीनच्या मदतीने या गायीला बाहेर काढले. या अद्भुत धाडशी कार्या बद्दल रेस्क्यू टीमचे दीपक जोशी, राकेश झाडें, दिनेश वर्मा, सूरज कुबडे यांचेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यासंदर्भात येथील बस स्थानकात असलेल पाण्याचं टाक हे खुल्या जागेत असून या ठिकाणी अनेक बेवारस प्राण्यांचा मुक्त संचार असतो व नेहमीच या टाक्यात कोणता तरी प्राणी पडतो. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी रिस्कयू टीमला बरीच मेहनत करावी लागतं असते. विशेषत: कोणतेही पाठबळ पाठीशी नसतांना ही युवक लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उद्योग मात्र निष्ठेने करीत आहेत.