मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज गुरु पौर्णिमेच्या निमित्याने कोट्यवधी शिवसैनिकांचे गुरु हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रमुखांना हिंगणघाट येथील पदाधिकाऱ्यांनी तसेच जेष्ठ शिवसैनिकांनी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे यांच्या निवासस्थानी असलेल्या हॉल मधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला स्वैच्छेने येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व गुरूंनी त्यांच्या शेवटच्या वेळेस केलेल्या भावनिक शब्द उद्धव व आदित्य यांना शिवसेना पक्षात सांभाळा असे वचन शिवसैनिकांना दिले त्याचेही स्मरण या प्रसंगी करण्यात आले.
आजच्या या गुरु पौर्णिमेच्या अभिवादनाच्या वेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, जिल्हा संघटिका संगीता कडू, शहर प्रमुख सतीश ढोमणे, माजी नपा उपाध्यक्ष श्रीधर कोटकर, माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाने, माजी युवासेना जिल्हा प्रमुख अभिनंदन मुनोत, तालुका संघटिका माधुरी खडसे, जेष्ठ शिवसैनिक दिलीप चौधरी, डॉ. आदर्श गुजर, सुनील आष्टीकर, सुरेश चौधरी, उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, लक्ष्मण बकाने, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश घोडे, सोशल मीडिया जिल्हाधिकारी रंजित रहाटे, शहर प्रमुख भूषण कापकर, शिवसैनिक विक्रम देवगिरकर, निलेश शिंदे, नारायण वर्मा, डॉ. आनंद जगताप, सुनील कडू, महेश धुरतकर, गौरव डफ, उत्तम भोमले, प्रेम यादव शेकापूर बाई पंचायत समितीचे प्रमुख विनोद मोहोड उपस्थित होते.