मोबाईल चोरी प्रकरणातील दुकान मालकास चोरान मार्फत शिवीगाळ प्रकरण.
अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १८ जुलै:- ५ जुलै रोजी सावनेर येथील मोबाईलच्या दुकानातील चोरी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम यांनी दुकान मालक प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांच्यासोबत वाद घातला. माझ्याशी वाद का घातला याचा वचपा काढण्याकरिता पाटील यांना गफलतीत दिनांक १४ जुलै ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास अभिषेक विरखरे यांच्यामार्फत कॉल करून बोलाविण्यात आले.
पोलिसांनी बोलावल्यामुळे पाटील काही वेळानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळी दोन्ही चोर व पोलीस उपनिरीक्षक ह गेडाम हे स्टेशन डायरीच्या रूम मध्ये होते. यासोबत इतरही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. तेथे पोहोचतात चोरांनी पाटील यांच्याशी अरेरावीची भाषा सुरू केली ‘तेरेको देख लेंगे तसेच जीवे मारण्याची धमकी दिली’ हे सर्व घडत असताना तपास अधिकारी गेडाम तेथे उपस्थित होते व बघायची भूमिका घेतली. काही वेळ चोरांनी अरेरांवी केली. त्यानंतर गेडाम व इतर पोलीस कर्मचारी चोरांना गाडीत बसवून न्यायालयात घेऊन गेले. त्यानंतर पाटील सुद्धा तेथून निघून गेले.
त्यानंतर पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास गुप्त माहिती मिळते की आज जी चोरांन बरोबर घटना झाली ती त्यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक गेडाम यांनी करून घेतली. कारण पाटील यांचा त्यांच्यासोबत वाद झाला होता. त्यांचा वचपा काढण्याकरता त्यांनी हे करून घेतले. हे एकूण पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली. रक्षन करणारे आज भक्षक बनले तर नागरिकांनी न्याय मागावा कुठे. शहरातील एका प्रतिष्ठित व उच्चशिक्षित व्यक्ती सोबत अशा घटना होत असेल तर साधारण जनतेने जायचे कुठे.
करिता सावनेर व्यापारी संघाने एका व्यापारी सोबत घडलेल्या घटनेचा निषेध करत स्थानिक पोलीस निरीक्षक मानकर यांना अशा नालायक पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. निलंबन न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापारी संघाकडून दिला असून दुकाने बंद करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव मनोज बसवार, सदस्य दिनेश दमाहे, किशोर अंतूरकर, राहुल बारई, प्रफुल चंदनखेडे उपस्थित होते.