खासदार अमर काळे यांचे नारायणपूर जनतेच्या वतीने करण्यात आले जल्लोषात स्वागत.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी नारायणपूर येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रेला भेट देऊन ऐतिहासिक प्रसिद्ध असलेले हेमाडपंथी मंदिरात गोपालकृष्ण देवस्थान येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी, महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी, महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी, संतांची शिकवण म्हणजे वारी, ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी, घरून निघायचे एखाद्या संताच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी, पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी असल्याने जिल्ह्यातील भाविकही वारीत सहभागी झाले आहे. मला वारीला जाणे शक्य झाले नाही त्यामुळे नारायणपूर येथेच विठ्ठल मंदिरात नतमस्तक झालो. असे मनोगत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी आयोजक देवस्थान कमिटीच्या वतीने खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार अमर काळे यांनी सर्वांचे स्वागत स्विकारून नारायणपूर गावातील जनतेचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, काँग्रेस किसानचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उपासे, अशोक वांदिले, डॉ रामकृष्ण खुजे, सरपंच चित्राताई पुसदेकर, गुनवंता कोटेकर, दशरथ ठाकरे, गणेश वैरागडे, सुभाष चौधरी, गजानन शेंडे, संजय लोणकर, तुषार थुटे, रोशन थुटे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.