मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत दि.०५ फेब्रुवारी २०२४ च्या जी.आर नुसार सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलग्नित रुग्णालय या प्रयोजनार्थ निःशुल्क हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटला लागून असलेली सरकारी जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी उपलब्ध असताना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट तहसीलदार हिंगणघाट इत्यादी खोटा अहवाल सादर केल्याबाबत तसेच जमिनीचा सातबारा शासनाच्या नावा वर असूनही शासनाचा खोटा अहवाल सादर केल्या प्रकरणी महसूल विभागाने संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे दिनांक १८ जुलै २०२४ ला भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या संपूर्ण ७/१२चा आराखडा लक्षात आणून देत लवकरात लवकर मेडिकल कॉलेजच्या जागेचा तिढा सोडून जागेची मंजुरी देण्याबाबतचे निवेदन सादर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभाग व औषधी द्रव्य विभाग आजच्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ चा शासन निर्णय क्रमांक MED२०२२/प्र. क्र.२२९(भाग- ब)/२२/शिक्षण-१ प्रमाणे वर्धा जिल्ह्याला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिंगणघाट हे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलांगित रुग्णालय या प्रयोजनार्थ निशुल्क हस्तांतरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे असा शासनाचा जीआर आहे.
त्याचप्रमाणे उपजल्हिा रुग्णालय हिंगणघाटला लागुन असलेली पुरपीडीत ले-ऑउटची खाली शिल्लक असलेली जागा, म्हाडाची खाली असलेली जागा, नगर पालीकेच्या आरक्षित जागा, वॉल कपांऊडची बांधलेली ट्रॅक, क्रीडा संकुल,सांस्कृतिक भवन इत्यादी जागेचे आरक्षण रदद करून शासकीय मैडीकल कॉलेजसाठी खाली असलेली सर्व जागा आरक्षित करून मंजुरी देण्यात यावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करीता राष्ट्रीय महामार्ग तथा पिंपळगाव रोड लगत लागत आवश्यक शासकीय जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी सदयपरिस्थित उपजिल्हा रुगणालय सुरु असुन सदर जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग खोल्या प्रयोगशाळा,वैदयकीय सुविधा वार्ड इत्यादी करीता पर्याप्त आहे तसेच उपजिल्हा रुगणालयात पूर्व बाजुस लगतच आरक्षण क्र.६७ प्राथमिक शाळा व आरक्षण क्र.६८ हायस्कुल करीता १.७४ हेआर (४.३५ एकर जागा मोकळी असुन या जागेचे करिकोळ बदलाचा प्रस्ताव शासनाला केल्यास सदर जागा कर्मचारी मुलांचे व मुलीचे वसतिगृह या करीता उपयोगात आणता येईल.सदर उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्यास मुळे या ठिकाणी मल्टीस्टोअर बिलडॉग सुध्दा बांधता येईल.
उपजिल्हा रुगणालय हे १६.८५ एकर जागेत आहे त्यात ०१ एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाला दिली आहे. सर्व्हे नं.१६९ मध्ये २.०२ हेक्टर म्हणजे ०५ एकर जागे मध्ये टप्याटप्याने मोकळ्या जागेत रेसिडेशिय क्वार्टर बांधले असुन पुर्ण जिर्ण झाले आहे जिर्ण झालेल्या रेसिडेसिय क्वार्टर पाहल्यास ०५ एकर जागा मेडीकल कॉलेजच्या उभारणीसाठी उपयोगात येवु शकते. सर्व्हे नंबर १९१/२, १९०,१६७,१६६ ही जागा महाडाच्या जागेच्या लगत असुन सर्व्हे क्रं.१९० आरजी ०.८८ हेक्टर आर चा ताबा म्हाडाला देण्यात आला आहे. परंतू ति जागा आज रोजी खाली आहे. १९१/२ ची आरजी ०१ एकर १६६ ची आरजी ०४ एकर १६७ ची आरजी ०४ एकर आज रोजी खाली असुन सर्व्हे क्रं. १९० ला संलग्न आहे. सर्व्हे क्रं.१६६, १६७ याचा ताबा दिला म्हाडाला असुन तो आज रोजी खाली आहे. सर्व्हे क्रं १६५ एकुण आराजी १० एकर असुन सदर सर्व्हे क्रं यापूर्वी म्हाडाला ताबा देण्यात आला आहे. १० एकर जागे पैकी अंदाजे ०५ एकर जागेवर महाडाने बांधकाम केले असुन ०५ एकर जागेपैकी काही जागेवर तात्पुरते स्वरूपाचे अतिक्रमण दिसुन येत आहे.
सर्व्हे नं १९४ पिंपळगाव रोडला लागून ०४ पावणे पाच एकर जागा खाली आहे. ही जागा न. पां.रिझव्हेंशन असुन खाली आहे. सर्व्हे नं. १९५ ला पुर पिढीत लोकाना ०२ एकर पैकी पटेटे दिले असून फक्त ०३ मकान बांधले आहे. ही जागा सरकार मोबदला देवून अपाल्या ताब्यात घेऊ शकते. उर्वरीत जागा खाली आहे. रीझर्वेशन के ६९ न १७७ या जागेवर ०.९८ हेक्टर आर म्हणजे २.५० अडीच एकर जागा रुग्णालय लगत आहे. इथे वॉल कंपाऊंड बांधले असुन जागा सुरक्षित आहे. ही जागा मैडीकल कॉलेजच्या उपयोगात येवु शकते.
डॉ.आंबेडकर होस्टलला दिलेली जागा ही खाली पडुन असुन डॉ.सायंकार हॉस्पीटलच्या बाजुला ०८ एकर असुन ति जवळपास जागा ०८ एकर असून खाली आहे. आरक्षण क्रं ७० हे कलोडे भवनच्या समोर असुन नॅशनल हॉयवेला लागले आहे. ति जागाशासकीय मैडीकल कॉलेज साठी उपयोगी येवु शकते. किडा संकुलाचे उदघाटन बि. सी. सी. ग्राउंड वर झाले असुन पक्की वॉल कंपाऊड आहे. त्या जागेवर किडा-संकुल बनवण्यात यावे.
सांस्कृतिक भवन साठी सव्हें न. १९४ ची ४.३० साडे चार एकर जागा मागितली आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकर चौकातील जुन्या सरकारी दवाखान्याची जागा शहराच्या मध्यभागी असुन नगर परीषदच्या प्रशासकीय बिल्डिंगला लागून आहे. त्यामुळे पिंपळगाव रोडवर सांस्कृतिक सभागृह बांधणे योग्य होणार नाही. त्याप्रमाणे भविष्यातील मेडीकल कॉलेजच्या एक्सटेशनसाठी पिंपळगाव रोडवर जागा रिझव्र्हेशन आहे तरी भविष्यात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी लागणरी जागा उपलब्ध आहे. जागा शासकीय असल्याने लगेच सरकारला प्रस्ताव पाठुन मंजुरी होऊ शकते आणि लगेच काम सुरू करता येईल तसेच ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने नागरीकांच्या सोईची आहे.
पिंपळगाव रोडवर सरकारची असलेली जागा असताना सुध्दा फक्त ०९ एकर जागा उपलब्ध असल्याचा दाखला उविभागीय अधिकारी व तहसिलदार करतात हे बेजबाबदारी पणाचे लक्षणे आहे. असा आमचा आरोप आहे. दबावाखाली उपजिल्हा रुग्णालय लगत शासकीय जागा असतांना खोटे दस्तावेज प्रकाशित करून शासनाची लक्तरे वेशिवर टांगण्याचा प्रकार सरु आहे. याची सरकारने दखल घ्यावी.
महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत दि.०५ फेब्रुवारी २०२४ च्या जी.आर नुसार सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलग्नित रुग्णालय या प्रयोजनार्थ निःशुल्क हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी शासनाचे निर्देशाप्रमाणे उपजिल्हा रुग्णालया लगत वैद्यकीय मेडीकल कॉलजेला मंजुरी देण्यात यावी. या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन लवकरात लवकर जागा निश्चित करण्यासंबंधी निवेदन सादर केले.