रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- शेतीच्या जुन्या वादातून शेतकऱ्यास काठीने बेदम करण्याची घटना मंठा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माळेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी मंठा पोलीस स्टेशन तक्रार दाखल करण्यात आली.
या विषयावर सविस्तरवर बातमी आशी की, वसंत नगर माळेगाव येथील शेतकरी मनोज उत्तम जाधव यांना गट नं ६९२ मध्ये तीन एकर जमीन असून ती वहीती करून त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, परंतु ता.१२ रोजी दुपारी मंठा येथुन त्यांच्या शेतातील पांदन रस्त्याने घरी जात असताना त्यांच्या गावातील व भावकितील चुलत चुलता हरिचंद्र शंकर जाधव व पत्नी सीमा हरिश्चंद्र जाधव व त्याची आई कमलाबाई शंकर जाधव यांनी मला थांबण्याच्या आवाज दिला मी माझी मोटरसायकल थांबवली. तेव्हा माझा चुलत चुलता हरिचंद्र व त्याची पत्नी व त्याची आई माझ्या अंगावर धाऊन आले आणि मागील भांडणाच्या कारणावरून व पाईपलाईनचा कारण करून मला माझा चुलत चुलता व त्याची पत्नी या दोघांनी मला खाली पाडून लाथा बुक्यानी मारहाण केल्याचे जाधव यांनी सांगितले.
पुढे बोलतांना म्हणाले कि, हरिश्चंद्र यांनी त्याच्या हातातील काठीने माझ्या उजव्या पायाच्या घोट्यावर मारून मुक्कामार दीला व माझ्या कमरेवर मारून मुका मार दिला व त्याच्या त्याच काठीने माझे कपाळावर मारून रक्त काढून जखमी केल. तेव्हा माझा मुलगा माझ्याकडे धावत आला व त्यांना म्हणाला की माझ्या वडिलाला मारू नका असे म्हणताच हरिश्चंद्र यांने माझ्या मुलाच्या पोटात मुक्का मारून खाली पडले. तेव्हा मला व माझ्या मुलास हरिश्चंद्र व त्याची पत्नी व त्याचे आई यांनी सर्वांनी मिळून आम्हाला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
तेव्हा गावातील गजानन साहेबराव राठोड यांनी सदर भांडण पाहिले व सोडविण्यासाठी पुढे आले. तरी इसम नामे हरिचंद्र जाधव, सीमा हरिश्चंद्र जाधव, कमलाबाई शंकर जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून मनोज उत्तम जाधव यांनी मंठा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रक्माजी मुंडे हे करीत आहे.