संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विविध शाखे च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहे.मात्र गृह विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने गृह विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाच्या नियमांमध्ये नियमावलीत बदल करण्यात यावा व गृह विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थी आर्ट,कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखेतून येत असल्याने या गृह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेतील कोवर ग्रुप मधील विषय निवडण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गृह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याकरिता सीबीसीएस पद्धतीनुसार अप्लाइट सायन्स या विषयाचा समावेश कोवर ग्रुप मध्ये करण्यात यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोरलावार, सहसचिव डॉ. सतीश कन्नाके, उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई, डॉ. अक्षय धोटे, डॉ. मिलिंद भगत, डॉ. निलेश चिमूरकर डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. राहुल सावलीकर या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त मागणी मान्य करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे.
यावेळी सरदार पटेल महाविद्यालयातील डॉ. उषा खंडाळे, डॉ. श्वेता गुंडावार उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी सदर मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.