अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आणि पिण्याच्या पाण्याच्या नळात नारू निघाल्याची घटना राजेंद्र घटे सावनेर यांच्या घरी घडली.
सावनेर नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा कळस दिसून येत आहे.१६ जुलै सोमवारला माजी नगरसेवक व भाजपा महामंत्री तुषार उमाटे यांनी प्रत्यक्ष समस्या जाणून घेऊन शहरातील नागरिकांना सोबत घेऊन मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर यांना तक्रार केली आहे.
तक्रार करून अनेक प्रश्न मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर यांना विचारले आहेत.
त्यात मुख्य म्हणजे शहरातील नागरिकांच्या नळाच्या पिण्याच्या पाण्यासोबत नारू निघाल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने नगरपरिषद सावनेर यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खिलवाड करणे या प्रकारचे आहेत. असा आरोप तक्रारी मध्ये माजी नगरसेवक व शहरातील नागरिकांनी केला आहे. सोबतच पुढे असा प्रकारे शहरातील नागरिकांचे आरोग्याशी कोणताही खिळवाड होऊ नये. या करिता शहरात जितके पण लिकेज असेल ते पूर्णपणे बंद करून शहरातील नागरिकांना साफ व फिल्टरचे पाणी देण्याची मागणी माजी नगरसेवक तुषार उमाटे व शहरातील नागरिकांनी केलेली आहे.
निवेदन देतेवेळी राजेंद्र घटे, संजय खोडनकर, सुनील पिसे,मनिष चित्तेवान व इतर नागरिक उपस्थित होते.