अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- रॉयल इंटरनॅशनल स्कूल सावनेर येथील विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिंपिएड या परीक्षेमध्ये कुमारी तेजस्वी पावनकर (इयत्ता – २) हिने इंडियन इंग्रजी ऑलिंपिएड (आयईओ) मध्ये राज्य रँक – ८ मिळालेली असून तिला उत्कृष्ट पदक, पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तसेच मनस्वी सोनवणे, वेदांशी कमाले, युवान सुके, प्रियांश मौर्या, सांगवी किरटकर, श्रेष्ठ जीवतोडे, फाल्गुनी मते, निशान ठाकरे या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रॉयल इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक अतुल नाईक, डॉ. पराग चौधरी, डॉ. उमेश जीवतोडे, देवेंद्र दलाल, विजय ठाकरे, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. सचिन चौधरी, महेंद्र वारोतकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक तुषार रेवतकर, बाह्य परीक्षा प्रभारी प्रिया सुके मॅडम, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.