मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या इंदाराम ग्रामपंचायत हद्दीतील मोदूमतुर्रा येते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अहेरी पंचायत अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प मंजूर झाले असून यासाठी अहेरी तालुक्यातील अती दुर्गम भागातील गांवाचा समावेश करण्यात आले आहे.या प्रकल्पाला अमंलबजावणी व मार्गदर्शन म्हणून बाय एफ पुणे संस्था करणार आहे. तर भारतीय उपजीविका प्रतिष्ठान दिल्ली, समन्वय, सहकार्य व आँक्सिस बँक संयुक्त विध्यमाने पाणलोट प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
त्या अनुसंगाने दिनांक 18 जुलै रोजी मोदुमतुर्रा येथे ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन ई पि आर ए करण्यात आले आहे. यामध्ये 1) सामाजिक नकाशा 2)जमीनीचा वापर नकाशा 3) जमीनीचा वर्गीकरण नकाशा व 4) शिवार फेरी काढून ग्रामस्थांनी सुचविलेले उपक्रम पाहणी करून विविध प्रकारची मोलाची माहिती देण्यात आली. सविस्तर प्रकल्प आराखडा एकदाच करून नंतर कामे करायची आहेत. असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आजच्या या कार्यक्रमाला मोदुंमतुर्रा गावचे पोलीस पाटील बिच्छू आलाम उपस्थित होते तर आशा वर्कर म्हणून सौ. उर्मिला तसेच सौ.कल्पना तावाडे, सौ. सुनिता कळंबे, सौ.गीता तावाडे सभासद, प्रतिष्ठित नागरिक, बचत गटाच्या महिला उपस्थित मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिथुन दुर्गे यानी केले तर प्रकल्पाची ई पि आर ए ची माहिती बायफ चे डोर्लीकर यांनी माहिती दिली. तर तर नकाशे काढण्यासाठी टिम लिडर बायफ कुडे, जिवन मेहर, श्री. आलाम यांनी पुढाकार घेतला. शेवटी प्रेरक, जगदीश चालूरकर यांनी उपस्थितांचे आभार म्हानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले आहे.