अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आषाढ़ी एकादशी आणि मोहर्रम च्या पूर्व संध्या वर हिंगनघाट येथील निखाड़े भवन मध्ये दिनांक 16 जुलैला संध्याकाळी 6 ते रात्रि 10 पर्यंत संगीतमय स्वागत समारोह चे आयोजन करण्यात आले. स्थानीय कलाकार आणि गणमान्य व्यक्ति च्या सहयोग ने हिंगनघाट मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार राजू तिमांडे, पुलिस नागरिक समन्वय समिति, भारत प्रवीण राऊत, डॉ. वैशाली राऊत (आगलावे) क्षेत्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, श्रीमती निशा शर्मा, अशोक मिहानी, पराग मुडे उपस्थित होते.
या प्रसंगी दर्पण हिंगनघाट चे संस्थापक आरिफ काजी आणि प्रवीण राउत यांचा सत्कार करण्यात आला. स्थानीय कलाकरांनी देखील आपल्या गीतांची बहारदार प्रस्तुति दीली. त्यामुळे उपस्थित रशिक आणि पाहुणे मंत्रमुक्त झाले.
कार्यक्रमच्या यशस्वी आयोजना करीता अजय चतारे, मुकेश रघाटटे, सचिन डफरे, नितिन तायडे, संगीता सूर्यवंशी ने सहयोग केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सुरजूसे यांनी केले. यावेळी हिंगणघाट येथील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.