मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक मार्ग बंद झाले आहेत. चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर ते येणापूर या मार्गावरील एका पुलावरून अचानक पाण्याच्या पातळीवर वाढ झाल्याने शेतात कामासाठी गेलेले लोक अडकले होते. मात्र, परत घराकडे येण्यासाठी पुलावरील पाण्याच्या प्रवातून आपल्या बैलांना घेऊन जीवघेणा प्रवास त्यांना करावं लागेल आहे. अनेक वर्षांपासून या मार्गावरील पुलाची मागणी गावकरी करत आहेत पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे या भागातील नागरिक पाण्यातून जीवघेणा प्रवास करावं लागतोय.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि कुरखेडा या भागात प्रचंड पाऊस झाला आहे. भामरागड मध्ये 103 मि.मी, तर कुरखेडा येथे सुमारे 116 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. सिरोंचाकडे जाणार्या रस्त्यांसह सुमारे 27 रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. गोसिखुर्द धरण आणि चिचडोड बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जेथे पुलावरुन पाणी वाहते आहे, तेथे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत
त्यात जिल्हातील अनेक नद्या नाले आणि धरणे पाण्याखाली आली असून पूरजन्य परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. 1) आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड 2) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी 3) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा 4) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी 5) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा 6) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा 7) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा 8) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा 9) करवाफा पोटेगाव रस्ता 10) मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता. कुरखेडा 11) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा 12) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज 13) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला 14) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)