रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर दि.19:- रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा परतुर या ठिकाणी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराला परतूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एल. डी. कोरडे तसेच सह न्यायाधीश आर. बी. सूर्यवंशी, वकील संघाचे अध्यक्ष महेंद्र वेडेकर सचिव सुरेश काळे, टी.व्ही मगर, माजेद पटेल यांनी या शिबिरा प्रसंगी वेगवेगळ्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
आज गरीब मुलांना शिक्षण घेणे दुरापत झाले आहे. शिक्षण हेच भारत देशाला उज्वल भवितव्य देऊ शकते. पण आज अनेक गरीब मुल चांगल्या शिक्षणापासून वंचित असून अशा मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे राज्य शासनाचे व केंद्र शासनाची कर्तव्य आहे असे मत परतुर वकील संघाचे सचिव ॲड. सुरेश काळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आखाडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. काटे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक वर्ग व विद्यार्थी संख्या उपस्थित होती.