विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- सध्या पावसाळा सुरू झाला असून त्यात एटापल्ली येतगे सर्वत्र जीवघेणे खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. येथे असलेल्या अंडा चौक ते फॉरेस्ट एटापल्ली नाल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्या मागील वर्षापासून खड्डेमय झाला होता. त्यात प्रशासनाने साधी डागडुजी केली नाही. अवघ्या काही दिवसात झालेल्या पावसाने रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ये जा करत असतात पण या रस्त्याच्या दुरस्ती कडे लक्ष नसून ते सर्व मूग गिळून गप्प आहे. त्यांची काही अडचण आहे काय अशा नागरिकांचा सवाल आहे.
एटापल्ली तालुकात मुसळधार पावसात त्याची रस्त्याची खडी वाहून गेली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकर या रस्त्याची दुरस्ती नाही झाली तर परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या इशारा यावेळी देण्यात आला आहे.
लोकप्रतिनधी व अधिकाऱ्याचे दुर्लक्ष: एटापल्ली शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना लोकप्रतिनधी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता ग्रामस्थांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एटापल्ली तालुका मुख्यालयातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ या रस्त्यावर असते अंडा चौक ते एटापल्ली नाल्या पर्यंत 2 किलो मिटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून रुग्णांना जाणे म्हणजे जीव घेणे आहे. शिवाजी चौक ते नगर पंचायत कडे जाणारा रस्ता हा पण खड्डेमय झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचे हे उदाहरण दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या रस्त्याची त्वरित दुरस्ती करावी अशी मागणी एटापल्ली येथील नागरिकांनी केली आहे.