पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठे महत्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे. वर्धा मार्गावरील पावनभूमी श्रीरामनगर येथे गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने “फिरता दवाखाना”चे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अगोदरच गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी एम.आर.आय, सी. टी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाउंड, डायलिसिस यासारख्या खर्चिक वैद्यकीय चाचण्या अत्यंत रास्त दरात किंबहुना शासकीय रुग्णालयपेक्षाही कमी दरात केले जात आहे. त्यामुळे हे सेंटर गरजू रुग्णांसाठी मोठं वरदान ठरत आहे.
त्यात आता सर्वांना उत्तम आरोग्य हे आनंदी जीवनाचे एक रहस्य असते. शहरातील व आसपासच्या गावातील जनतेला फिरता दवाखाना या आरोग्यसेवेचा लाभ मिळावा म्हणून गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर तर्फे “फिरता दवाखाना”चे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते आज सकाळी झाले. यावेळी समस्त कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीत फिरता दवाखाना बसला हिरवी झेंडी दाखवून ही बस सुरू करण्यात आली.