आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी आमदार राजु तीमांडे, शासकीय महाविद्यालय महिला संघर्ष समिती, सावित्रीच्या लेकी चॅरीटेबल ट्रस्ट, शासकीय महाविद्यालय संघर्ष समिती अशा वेगवेगळ्या संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शहराच्या मध्यभागी डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागच्या बाजूला जुना सरकारी दवाखाना इथे असलेल्या खाली जागेवर बांधण्यात यावे ह्याकरता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेन्द्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, राधाकृष्णन विखे महसूल मंत्री महा.मुंबई ह्यांना उपविभागीय अधिकारी हिनगणाघाट शिल्पा सोनाले मार्फत निवेदन सादर केले.
सरकार तर्फे हिंगणघाट शहरात सांस्कृतिक भवन मंजूर झाले आहे. हिंगणघाट शहराचा व्याप मोठ्या प्रमाणत वाढला असून डा. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मध्यभागीं असून रहदारिसाठी नागरीकांना सोयीचा आहे. त्याला लागून जुन्या सरकारी दावाखान्याची जागा खाली पडून असून गावातील टेम्पो, मेटाडोर, ट्रक इत्यादी वाहने उभी असतात. विश्वसानिय वृत्तानुसार मौजा पिंपळगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या सर्वेनं १९४, १९५, १८५ या शासकीय जागेवर ०.६९ हेक्टर जागा म्हणजे दीड ते पाउनेदोन एकर जागेवर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी नगर पालिके कडून पैसे भरून आकस्मिक मोजणी केली जात आहे. अशाप्रकारे उपजील्हा रुग्णालयला वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या सरकारी जमिनी सांस्कृतिक सभागृह, क्रीडा संकुल इत्यादीसाठी मंजूर करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यासंबंधात नुकतीच नगरपलिकेद्वारा आकस्मिक, अति घाईची आणि संशयित मोक्काचौकशी एकाच दिवसात पैसे भरून करण्यात आली होती. शासकीय उपजिल्हा रूग्णालय इथेच व्हावे महाविद्यालय संदर्भातील महिला संघर्ष समितीचे आमरण उपोषन सोमवार पासून उपविभागिय कार्यालयासमोर करण्यात आले आहे. तरी मंजूर झालेले सांस्कृतिक भवन हे शहराच्या मध्यभागी डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौकात खाली असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याचा जागेवर डॉ. आंबेडकर पुतळ्याचे मागे मंजूर करून बांधण्यात यावे असे निवेदन आंज देण्यात आले. त्या सभागृहाला डॉ .बाबसाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह असे नाव अर्पण करण्यात यावे असेही नमूद केले गेले. अन्यथा आंदोलनत्मक मार्ग पत्करण्यात येईल असा इशारा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी केला.
यावेळी महाविद्यालय महिला संघर्ष समिती तर्फे रागिणी शेंडे, शितल तिवारी, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, सिमा तिवारी, सुनिता तामगाडगे, आचल वकील, सुनिता तळवेकर, सुजाता जिवनकर, गिता मेश्राम, रत्नमाला टापरे, माया भोयर, मंदाकिनी ढाले, सविता गिरी, सुनिता गुजरकर, सुजाता जांबुकर, गीता मेश्राम, सुजाता जीवनकर, आचल वकील, सुनीता तायवाडे, विजया आगबत्तलवार तसेच सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट कडून सीमा मेश्राम, राजश्री बांबोळे, निर्मला भोंगाडे, प्रमोदिनी नगराळे, नंदिनी मांडवे, संगीता लभाने, सुषमा पाटील, शारदा जांभुळकर, या प्रसंगी शासकीय महाविद्यालय संघर्ष समिती तर्फे सुनील पिंपळकर, अमित रंगारी संदेश मुन इत्यादी उपलब्ध होते.