आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.24:- सद्यास्थितीत जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून जुलै 2024 मध्ये 418.0 मि.मी सरासरी पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जल प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.
भारतीय हवामान विभागाने दि. 24 जुलै रोजी यलो अर्लट दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा नागरिकांनी प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कालचे पर्जन्यमान दि.23 जुलै रोजी सरासरी पर्जन्यमान आर्वी तालुक्यातील 6 मंडळात एकुण 56.6 मि.मी., कारंजा तालुक्यातील 4 मंडळात 44.7 मि.मी., आष्टी तालुक्यातील 4 मंडळात 34.9 मि.मी., वर्धा तालुक्यातील 7 मंडळात 48.6 मि.मी., सेलू तालुक्यातील 5 मंडळात 60.7 मि.मी., देवळी तालुक्यातील 6 मंडळात 29.0 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील 8 मंडळात 13.8 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील 8 मंडळात 33.1 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 48 मंडळात एकुण 38.6 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी झालेली मंडळे: आर्वी तालुक्यातील खरांगणा 90.8, वर्धा तालुक्यातील वर्धा 90.8 व आंजी 90.8 तसेच सेलू तालुक्यातील झाडसी 93.0 एकूण 4 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
नद्यांची पाणी पातळी: समुद्रपुर तालुक्यातील धाम नदीच्या हमदापूर येथील 224.80 पाणी पातळी क्षमता असून सध्याची पाणी पातळी 222.18 मीटर असून 645.49 क्युमेस विसर्ग सुरु आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथील 214.240 पाणी पातळी असुन सद्या 208.92 पाणी पातळी असुन 1323.84 क्युमेस विसर्ग सुरु आहे. तर देवळी तालुक्यातील सिरपुर येथील पाणी पातळी 238.00 असुन सद्याची पाणी पातळी 230.20 मीटर असुन 210.447 क्युमेस विसर्ग सुरु आहे.
प्रकल्पाची पाणी पातळी बोर प्रकल्पाचा एकुण जलसाठा 134.542 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 50.16 टक्के, निम्न वर्धा प्रकल्पाचा 253.340 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 63.20 टक्के, धाम प्रकल्पाचा 69.435 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 84.16 टक्के, पोथरा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 38.420 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.02 टक्के असून 150.710 क्युमेस विसर्ग सुरू आहे. पंचधारा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 9.680 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 94.86 टक्के, डोंगरगाव प्रकल्पाचा एकुण जलसाठा 4.810 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.09 टक्के असून 1.736 क्युमेस विसर्ग सुरू आहे. मदन प्रकल्पाचा 11.460 द.घ.ल.मी जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 78.59 टक्के, मदन उन्नई प्रकल्पाचा जलसाठा 3.720 द.घ.ल.मी असुन 100 टक्के असून 15.230 क्युमेस विसर्ग सुरू आहे, लालनाला जलसाठा 29.515 द.घ.ल.मी असुन 58.28 टक्के असून 5 गेट 10 से.मी. उघडे आहे. वर्धा कार नदी प्रकल्प जलसाठा 25.962 द.घ.ल.मी असुन 100 टक्के असून 122.670 क्युमेस विसर्ग सुरू आहे व सुकळी लघू प्रकल्पाचा जलसाठा 11.920 द.घ.ल.मी असुन 53.63 टक्के भरलेले आहे.
इतर प्रकल्पाची पाणी पातळी नांद प्रकल्पाचा एकुण जलसाठा 62.182 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 35.12 टक्के असून 39.096 क्युमेस विसर्ग सुरू आहे. वडगाव प्रकल्पाचा जलसाठा 151.496 असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 70.87 टक्के असून 296.870 क्युमेस विसर्ग सुरू आहे. उर्ध्ववर्धा प्रकल्प जलसाठा 678.270 असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 53.92 टक्के व बेंबळा प्रकल्पाचा जलसाठा 203.330 असुन 45.32 टक्के भरलेले असून 42.000 क्युमेस विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात एकाही गावाचा संपर्क तुटलेला नसून ढगा ते ब्राम्हणवाडा रस्ता बंद आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.